|
गावामध्ये खुप प्राचिन काळातले महादेवाचे मंदिर आहे हे मंदिर गोपालेश्वर
देवालय म्हणून ओळखले जाते. मंदिरामध्ये गेल्यावर त्याचे ती रेखिव कलाकृती पाहुन सामजते
कि मंदिर खुपच प्राचिन काळातले आहे. या मंदिरामध्ये दत्त, विठ्ठल-रुक्मीनी, हनुमान,
गणपती या देवांची स्थापना करण्यात आली आहे. हे गावामधील मुख्य दैवत मानले
जाते या देवाची दरवर्षी नोव्हेंबर महिण्यामध्ये तुलशी विवाह दुसर्या दिवशी यात्रा
आयोजीत केली जाते.
|